Wednesday, October 14, 2026
Homeकोंढाळाअन्.... कोंढाळ्याची जनता थिरकली शिवाजी महाराज आणि आंबेडकरांच्या गाण्यावर...!- गावातील सरपंच बनल्या...

अन्…. कोंढाळ्याची जनता थिरकली शिवाजी महाराज आणि आंबेडकरांच्या गाण्यावर…!- गावातील सरपंच बनल्या जिजाऊ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून युवा वीर मराठा मंडळातर्फे सार्वजनिकरित्या दोन दिवसीय शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

१८ फेब्रुवारीला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले; तर १९ फेब्रुवारी ला सायंकाळच्या सुमारास शिवरायांची भव्य-दिव्य मिरवणूक गावातील दुर्गा माता मंदिर परिसरा पासून ते संपूर्ण गावामध्ये काढण्यात आली.मिरवणुकीमध्ये माता जिजाऊ,बालक शिवराय, मोठे शिवराय यांची वेशभूषा परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढविण्यात आली.त्याच्रमाणे गावातील छोटी-मोठी लहान मुले-मुली,युवक,युवती, महिला वर्ग,पुरुष वर्ग,वयोवृद्ध,आबालवृद्ध सर्वजण मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर थिरकत होती. डीजेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्या बरोबरच डॉ.बाबा साहेब आंबेडकर व इतर गाण्यावरही गावातील जनता थिरकुन जयघोषाचे नारे देत होती.संपूर्ण गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की,जय; डॉ.बाबा साहेब आंबेडकर की,जय; अश्या प्रकारे जयघोषाचे नारे गुंजत होते.

शिवरायांच्या जयंती मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे कोंढाळा ग्रामपंचयतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत ह्या माता जिजाऊ बनल्या होत्या; तर बाल पणातील शिवराय देवांश तुपट आणि तरुण पणातील शिवराय दिनेश मैंद बनले होते.गावातील सरपंचा उच्च शिक्षित,मनमिळावू,दयाळू,ना कुणा विषयी द्वेष,ना आक्षेप,ना उजर-तक्रार,सर्वांप्रती आदर; अशा विवीध गुण संपन्न स्वामित्वाच्या धनी असल्याने गावातील कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम वा उपक्रम असोत; त्यामधे स्वतः पुढाकार घेऊन हिरी-हिरीने भाग घेत असतात.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!