Monday, July 13, 2026
Homeनागपूरन्यायालयाने नागपूर हिंसाचारातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; कोठडीत वाढ..

न्यायालयाने नागपूर हिंसाचारातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; कोठडीत वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सोमवार १७ मार्च २०२५ रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी मास्टरमाइंड फहीमसह ६ आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीमवर ५०० हून अधिक दंगलखोरांना गोळा करण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे.अशातच हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानने नागपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.फहीमने दावा केला की,विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केल्यामुळे त्याला राजकीय सूडबुद्धीतून अटक करण्यात आली आहे.अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाचा शहराध्यक्ष फहीम खानची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.यानंतर फहीमने नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.जामीन अर्जात म्हटले आहे की,त्याला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे आणि त्याने जमावाला भडकावल्याचा कोणताही पुरावा नाही.हे आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यातच पोलिसांनी हिंसाचारात त्याची थेट भूमिका असल्याचे सांगितलेले नाही.त्याच्याविरुद्ध दाखल केलेला खटला राजकीय सूड बुद्धीने चालवला जात आहे.कारण १८ मार्च रोजी त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.फहीम खानला १८ मार्च रोजी गणेशपेठ पोलिसांनी देशद्रोहासह विविध गंभीर गुन्ह्यांत अटक केली होती.त्याची पोलीस कोठडी काल,सोमवारी ३१ मार्च रोजी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.नागपुरातील महाल परिसरातील हिंसाचार प्रकरणात मुख्य आरोपी आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम शमीम खान याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एय.यू.मोटे यांनी ११ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे.अशातच फहीम खानच्या जामीन अर्जावर ८ एप्रिलला सुनावणी होणार आहे.त्याचवेळी आरोपी हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर उद्या,बुधवार २ एप्रिलला न्यायालयात सुनावणी होणार असून त्यामध्ये पोलिसांना केस डायरीसह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान,फहीमच्या नियमित जामिनासाठी आज,मंगळवारी १ एप्रिलला सत्र न्यायाधीश ओझा यांच्यासमोर सुनावणी झाली.न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने त्याला आणखी काही दिवस तुरुंगातच राहावे लागणार आहे.न्यायालयात आरोपीतर्फे ॲड.अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली,तर सरकारतर्फे अ‍ॅड.मेघा बुरंगे यांनी युक्तिवाद केला.सरकारी वकिलांनी फहीम खानवर लावण्यात आलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने त्याला जामीन देऊ नये,असा युक्तिवाद केला होता.त्यामुळे आरोपी फहीम खानची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!