Friday, August 7, 2026
Homeनागपूरदगडफेक आणि जाळपोळच्या घटनेनंतर नागपुरात संचारबंदी आदेश लागू...

दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेनंतर नागपुरात संचारबंदी आदेश लागू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करीत काल सोमवारी दुपारच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.त्यातच संध्याकाळी सातच्या सुमारास दुसरा गट रस्त्यावर उतरला.त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली.काही ठिकाणी वाहने पेटवून देण्यात आली.शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले.त्यांना पोलिसांनी चिटणीस पार्कापर्यंत मागे ढकलले.परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.मात्र,त्यानंतरही तणाव कायम होता. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले असून आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.नागपुरात काल सोमवारी रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.अशातच आता भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.नागपूर शहरातील कोतवाली,गणेशपेठ,लकडगंज,पाचपावली,शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन,इमामवाडा,यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी आदेश लागू राहणार आहे.नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी यासंदर्भात आदेश जारी करुन पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचे म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!