Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीजंगल परिसरात फिरतांना आढळून आले; चौकशी अंती दोघेही जहाल नक्षलवादी निघाले..!

जंगल परिसरात फिरतांना आढळून आले; चौकशी अंती दोघेही जहाल नक्षलवादी निघाले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पोलीस पथकासह केंद्रीय राखीव पोलीस दल(सीआरपीएफ)३७ बटालियनचे पथक गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील आरेवाडा जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना दोन संशयित व्यक्ती जंगल परिसरात फिरतांना आढळून आले.पथकाच्या जवानांनी दोघांनाही ताब्यात घेत गडचिरोली पोलीस मुख्यालयात सखोल चौकशीसाठी आणले असता सखोल चौकशी अंती दोघेही जहाल नक्षलवादी निघाल्याने आज,बुधवार ५ मार्चला विविध कलमान्वये दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते आरेवाडा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी फिरत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.१.केलु पांडू मडकाम ऊर्फ दोळवा (पीपीसीएम,कंपनी क्र.२०),वय २६ वर्षे रा.मुरकुम,पोस्टे-तर्रेम,ता.उसूर जि.बिजापूर (छत्तीसगड) २.रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी (पार्टी सदस्य,भामरागड दलम),वय ३२ वर्षे रा.मेंढरी, ता.एटापल्ली,जि.गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.केलु पांडू मडकाम ऊर्फ दोळवा याचेवर आजपर्यंत ५ गुन्हांमध्ये सहभाग असून ४ चकमक व १ जाळपोळ या गुन्हांचा समावेश आहे.तर रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी हिच्यावर आजपर्यंत १२ गुन्हे दाखल असून ८ चकमक व ४ खून गुन्हांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दिरंगी-फुलनार जंगल परिसरात ११ फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोघांचाही सक्रिय सहभाग होता.या चकमकीत एका सी-६० जवानाचा मृत्यू झाला होता.महाराष्ट्र शासनाने केलु पांडू मडकाम ऊर्फ दोळवा याचेवर ६ लाख रुपयाचे तर रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी हिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!