Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीभामरागड तालुक्यातील दोन जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण..

भामरागड तालुक्यातील दोन जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दोन जहाल नक्षलवाद्यांनी आज,गुरुवार २७ फेब्रुवारीला गडचिरोली पोलिसांसह केंद्रीय राखीव(सीआरपीएफ) दलापुढे आत्मसमर्पण केले.३० वर्षीय सुरेश उर्फ वारलू ईरपा मज्जी,रा.मिळदापल्ली, ता.भामरागड व ५६ वर्षीय कांता उर्फ कांतक्का उर्फ मांडी गालू पल्लो,गुडंजूर,ता.भामरागड अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. शासनाने दोघांवर १८ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
सुरेश उर्फ वारलू ईरपा मज्जी👇
२०२१ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. सप्टेंबर २०२४ पर्यंत तो तेथे कार्यरत होता.त्यानंतर त्याने डीव्हीसीएम राजू वेलादी उर्फ कलमसाय याचा अंगरक्षक म्हणून काम केले.त्याच्यावर चकमकीचा १ गुन्हा दाखल असून,शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
कांता उर्फ कांतक्का उर्फ मांडी गालू पल्लो 👇
१९९३ मध्ये ती मद्देड दलममध्ये भरती झाली.पुढे १९९५ ते १९९८ पर्यंत तिने प्लाटून क्रमांक २ मध्ये काम केले. त्यानंतर २००१ पर्यंत ती भामरागड दलमची सदस्य होती. याच वर्षी तिला पेरमिली दलमची उपकमांडर म्हणून बढती मिळाली. तेथे ती २००३ पर्यंत कार्यरत होती. त्यानंतर तिची बदली चातगाव दलममध्ये करण्यात आली.२००६ पर्यंत ती तेथे कार्यरत होती. पुढे तिची एसीएम पदावर बढती होऊन टिप्पागड दलममध्ये बदली करण्यात आली. २००८ मध्ये पुन्हा तिला डीव्हीसीएम म्हणून बढती मिळाली आणि चातगाव, टिप्पागड व कसनसूर दलमच्या क्रांतिकारी महिला संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली.२०१५ पासून ती अबुजमाडमध्ये सप्लाय टीमची डीव्हीसीएम म्हणून आजतागायत कार्यरत होती.तिच्यावर चकमकीचे ७,जाळपोळीचा एक व इतर ३ अशा ११ गुन्ह्यांची नोंद आहे.शासनाने तिच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!