- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-वडसा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या पोर्ला वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या नवरगाव जंगल परिसरासह अगदी गावशेजारी जंगली हत्तींचा कळप मंगळवार ११ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान आढळून आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.सायंकाळच्या सुमारास पोर्ला वरून नवरगावला जाणाऱ्या एका व्यक्तीला जंगली हत्तींचा कळप गावशेजारी जातांना दिसून आला.त्यामुळे सदर व्यक्तीने याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली.गावकऱ्यांनी जंगली हत्तींना पळविण्यासाठी फटाके फोडून पळविण्याचा प्रयत्न केला.त्यातच जंगली हत्तींनी भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.अशातच आता हत्तींचा कळप काल शनिवारी पोर्ला वनपरिक्षेत्राच्या वसा-चुरमुरा परिसराच्या जंगलात दिसून आला.सहा दिवसांपूर्वी हाच कळप याच भागात आलेला होता. सध्या पोर्ला वनपरिक्षेत्राच्या परिसरातील भागात शेतकऱ्यांनी मका उन्हाळी धान पिकाची लागवड केलेली आहे.मका पीक कणसावर आहे,तर धान पीक सुद्धा जोमात वाढलेले आहे.त्यामुळे जंगली हत्तींच्या आगमनाने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.पिकांवर जंगली हत्तींच्या कळपाची वक्रदृष्टी पडल्यास पीक नेस्तनाबूत होऊन केलेल्या मेहनतीवर पाणी पडल्याशिवाय राहणार नाही.अशातच जंगली हत्तींच्या कळपामुळे कुठल्याही प्रकारची मानवी हानी होऊ नये,यासाठी वनविभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.याशिवाय हुल्ला टीम हत्तींच्या मागावर असून स्थानिक कर्मचाऱ्यांची चमू देखरेख ठेवत आहे.
- Advertisement -

