Sunday, August 9, 2026
Homeनागपूरप्रभारी उपशिक्षणाधिकारी सह वरिष्ठ लिपिक एसीबी जाळ्यात... - शिक्षण विभागात खळबळ..

प्रभारी उपशिक्षणाधिकारी सह वरिष्ठ लिपिक एसीबी जाळ्यात… – शिक्षण विभागात खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अनेकांना मोठ-मोठे वेतन असूनही वरची कमाई खाण्याची सवय जडलेली असल्याचे एसीबीच्या कारवाई वरून दिसून येत आहे.अशीच कारवाई चक्क प्रभारी उपशिक्षणाधिकारी सह वरिष्ठ लिपिकाच्या बाबतीत उघडकीस आली आहे.११ वी आणि १२ वीच्या वर्गाचा दर्जा वाढविण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या प्रभारी उपशिक्षणाधिकारी व वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक करून गजाआड केले आहे.या कारवाईमुळे चिरीमिरी घेणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांमुळे खळबळ उडाली आहे.
सुशील पंढरीनाथ बनसोड वय ४९ वर्षे  आणि नितीन राजाराम नेवारे वय ३८ वर्षे,रा.जाटतरोडी अशी लाच घेतांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.बनसोड हा शिक्षण विस्तार अधिकारी असून, त्याच्याकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार आहे.तर,नितीन नेवारे याच्याकडे धंतोलीतील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपिकाचा प्रभार आहे.यातील तक्रारदारांना त्यांच्या शाळेत असलेल्या ११ वी व १२ वी या दोन वर्गाचा दर्जा वाढवायचा होता.मोबदल्यात बनसोड याने २० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी ५ हजार रुपये लाच स्वीकारून उर्वरीत १५ हजार रुपयांची मागणी केली. तर,शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्राप्त झालेला प्रस्ताव शासनाकडे त्रुटी न काढता पाठविण्याकरिता नितीन नेवारे याने २० हजारांची लाच मागितली होती.
लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.विभागाने दिलेली तक्रार पडताळून पाहिली. त्यानंतर प्रभारी उपशिक्षणाधिकारी बनसोड यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली.त्यानंतर आरोपी नेवारे यालाही ताब्यात घेऊन दोघांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!