- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे घरगुती सहाय्यक क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध असून युवकांनी संकेतस्थळावर नोंदणी करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या २५ ते ४५ वर्षे वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.सोबतच उमेदवाराकडे (घरगुती सहायक) सेवांसाठी पारंगत,भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.याशिवाय भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी,नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण,तसेच जीडीए,एएनएम,जीएनएम,बी.एस्सी नर्सिंग,पोस्ट बी. एस्ससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहणार आहे.
इस्राईलला नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी
https:// maharashtrainternational.com या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करून संधीचा लाभ घ्यावा,तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य,विकास रोजगार व उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली येथे सपंर्क साधावा; असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.
- Advertisement -

