Saturday, May 2, 2026
Homeनागपूरअज्ञात वाहनाची बिबट्याच्या जबड्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

अज्ञात वाहनाची बिबट्याच्या जबड्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा (मादी) मृत्यू झाल्याची घटना काल,रविवारी नागपूर वनविभागाच्या हद्दीतील रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कांद्री मनसर-जबलपूर महामार्गावर घडली.
मृत बिबट्याचे वय ५ वर्षे असल्याचा अंदाज आहे.
घटनास्थळ पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागूनच आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडून पलीकडे जात असतांना बिबट्याचा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.महामार्ग ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने बिबट्याच्या जबड्याला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.याबाबत माहिती मिळताच रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत व वनकर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!