Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीतुम्ही अर्ज केला काय? कुटूंबातील कर्ता पुरुष मृत पावल्यास शासनातर्फे २० हजाराचे...

तुम्ही अर्ज केला काय? कुटूंबातील कर्ता पुरुष मृत पावल्यास शासनातर्फे २० हजाराचे अनुदान.. – चामोर्शी तालुक्यातील ६७ कुटुंबांना १३ लाख ४० हजारचे अनुदान वितरित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत द्रारिद्रयरेषेखालील कुटूंबातील कर्ता पुरुष मृत्यु पावल्यामुळे,केंन्द्र व राज्य शासनातर्फे प्रती कुटुबांस एकरकमी रुपये २० हजार अनुदान दिले जाते.त्यानुसार केंन्द्र शासन व महाराष्ट्र शासन अंर्तगत “प्रशासन गाव की ओर” या उपक्रमांअतर्गत,चामोर्शी येथे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांचे अध्यक्षतेखाली  तालुक्यातील द्रारिद्रयरेषेखालील पात्र असलेल्या एकुण ६७ लाभार्थी कुटुंबीयांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत एकरकमी रुपये २० हजार प्रमाणे एकुण १३ लाख ४० हजार अनुदान वितरीत करण्यांत आले आहे.
“प्रशासन गाव की और” या उपक्रमांअतर्गत नायब तहसिलदार( संजय गांधी योजना)गिरीश नरोटे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदानाबाबत माहिती देऊन प्रस्तावना सादर केली.तर तहसिलदार प्रशांत घोरुडे यांनी लाभार्थींना प्रमाणपत्राचे वाटप व मार्गदर्शन केले.तसेच तलाठी कार्यालय निहाय राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात येत असुन,राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या सर्व लाभार्थी यांनी,तलाठी कार्यालयात आपले नाव मंजुर यादीमध्ये समावेश आहे अथवा नाही,याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व ऑनलाइन अनुदान वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महसुल अधिकारी जयश्री मडावी सह आनंद वाढई यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!