- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-एका ३२ वर्षीय आईने कारागृहात बंद असलेल्या पतीची जमानत घेण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाला १ लाख रुपयांत विकल्याची घटना उघडकीस आली आहे.प्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुजरात आणि कर्नाटकात पसरलेल्या आंतरराज्यीय बाल तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आठ महिलांसह नऊ जणांना अटक केली आहे.ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यात ३२ वर्षीय आईचाही समावेश आहे.या महिलेला कारागृहात बंद असलेल्या आपल्या पतीची जमानत करून घ्यायची होती.त्यासाठी तिने आपल्या मुलाला विकल्याची माहिती समोर आली आहे.महिलेच्या सासूने पोलिसात तक्रार दाखल केल्यावर तिच्या मुलाचा १ लाख रुपयांत विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
सुलोचना सुरेश कांबळे वय ४५ वर्षे,मीरा राजाराम यादव वय ४० वर्षे,योगेश भोईर वय ३७,रोशनी घोष वय ३४ वर्षे,संध्या राजपूत वय ४८ वर्षे,मदिना ऊर्फ मुन्नी इमाम चव्हाण वय ४४ वर्षे,तैनाज शाहीन अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
- Advertisement -

