Wednesday, June 24, 2026
Homeपुणेलग्नाला झाली आठ महिने,तरी पती जवळ येईना; माहिती पडताच नववधूला बसला धक्का...

लग्नाला झाली आठ महिने,तरी पती जवळ येईना; माहिती पडताच नववधूला बसला धक्का…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे: फिर्यादी महिला ही ३० वर्षांची आहे.सदर महिला ही बी.टेक.आणि एम.बी.ए.अशी उच्चशिक्षित आहे.ती एका कंपनीत नोकरीस आहे.जून २०२२ मध्ये तिचा विवाह पुण्यातील एका उच्चशिक्षिततरुणासोबत झाला.तिचा पती अभियंता असून,तोही एका बड्या कंपनीत नोकरीस आहे.लग्नानंतर ते मधुचंद्रासाठी मालदीव येथे गेले होते.पण त्यांच्यामध्ये पती-पत्नीप्रमाणे संबंध आले नाहीत.त्यानंतरही पतीकडून टाळाटाळ सुरू होती.

लग्न होऊन आठ महिने झाले तरी पती जवळ येत नाही.जवळ झोपण्याऐवजी लांब जाऊन झोपतो. याविषयी जाब विचारला तर मला शरीरसंबंध ठेण्याची इच्छा होत नाही असे उत्तर मिळते.हा प्रकार घडलाय पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या चंदननगर परिसरात.याप्रकरणी पत्नीने पती विरोधात चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.लग्नाच्या आठ महिन्यानंतरसुद्धा पती आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही.म्हणून या महिलेने पतीकडे विचारणा केली.तिच्या लक्षात आले की आपला पती शाररिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे.सत्य समजताच तिच्या पायाखालची वाळूच सरकली.आपली फसवणूक झाली असल्याचे समजले.पण पुढे आणखी भयंकर तिच्या आयुष्यात घडणे बाकी होते.

याविषीयी कुठे वाच्यता करू नये म्हणून तिला मारहाण करण्यात येऊ लागली.शाररिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता.यासाठी पती आणि सासू-सासऱ्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण केली.याबाबत विवाहितेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अद्याप कोणाला अटक केलेली नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!