- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील कमलापूर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती भांडणावरून २० वर्षीय तरुणीने घरी ठेवलेले कीटनाशक प्राशन केल्याने तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सदरची घटना काल,रविवारी ८ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली.
करुणा पोचमलू निर्ला वय २० वर्षे रा.कमलापूर असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.
माहितीनुसार,घटनेच्या दिवशी करुणाचे आई- वडिलांशी कडाक्याचे भांडण झाले होते.त्यामुळे आईने मीच विष प्राशन करून मरते,अशी धमकी मुलीला दिली.आईने बोलल्याचे शब्द मुलीच्या मनाला लागले.त्यामुळे करुणाने रागाच्या भरात घरी ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले.मुलीने विष पिल्याची बाब काही वेळानंतर कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले; परंतु येथे कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते.त्यातच रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी गडचिरोली येथे पाठविली होती.तेव्हा प्रभारी वैद्यकीय अधिकारी राजेश मानकर यांच्याशी काही लोकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी वाहन उपलब्ध करून दिले.तोपर्यंत बराच उशीर झाला होता.करुणाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- Advertisement -

