Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीव्यवसायासाठी मिळणार ५० लाखापर्यंतचे कर्ज...

व्यवसायासाठी मिळणार ५० लाखापर्यंतचे कर्ज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावी म्हणुन एन.एस.एफ.डी.सी.योजना राबविण्यात येते. सदर योजने अंतर्गंत गरजु व पात्र लाभार्थांना ५ लाख रुपये ते ५० लाख रुपये पर्यंत विविध व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.यासाठी कर्ज प्रस्ताव केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम-सुरज या पोर्टलवर ऑनलाइन पध्दतीने खालील कागदपत्रांसह अपलोड करावी व तिन प्रतित जिल्हा कार्यालयात सादर करावी.
आवश्यक कागदपत्रे👇
१.जातीचा दाखला (तहसिलदार यांच्या कडुन घेतलेला)
२.उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांच्या कडुन घेतलेला) उत्पन्न मर्यादा शहरी-ग्रामीण ३ लाखपेक्षा कमी
३.अर्जदाराचे छायाचित्र (फोटो)
४.शिधापत्रिका (पहिला पान)
५.आधार कार्ड (पहिली बाजु)
६.आधार कार्ड (मागील बाजु)
७.यापुर्वी कर्ज/अनुदान न घेतल्या संबंधी प्रतिज्ञापत्र
(१०० रुपये च्या स्टॅम्प पेपर वर Affidavit करून)
८.जमीन / दुकानाच्या उपलब्ध तेचा पुरावा (जिथे व्यवसाय करणार आहे त्या जागेचा पुरावा)
९.जागा भाडयाने घेणार असल्याचा भाडेकरार
१०.व्यवसायिक तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभव/प्रशिक्षणाचा पुरावा
११.व्यवसायाचा प्रकल्प अहवाल ७५% एन.एस.एफ.डी.सी. २०% बीजभांडवल (१० हजार रुपये अनुदानासह) व ५% अर्जदाराचा स्वत:चा सहभाग
१२.वस्तुंचे/साहित्याचे खरेदी करावयाचे कोटेशन
१३.स्वयंघोषणा पत्र (१०० रुपयेच्या स्टॅम्प पेपर वर affidavit करून) कर्ज मंजुर झाल्या नंतर दोन जमानतदार देणार असल्यासंबंधी
१४.सिबील प्रमाणपत्र
१५.व्यवसायाच्या अनुषंगाने इतर कागदपत्र (उपलब्ध असल्यास)
तसेच या महामंडळाकडे बिजभांडवल योजना राबविण्यात येते.सदर योजनेत प्रकल्प रक्क्म ५० हजार च्या वर ७ लाख पर्यंतच्या कर्ज प्रकरणात महामंडळाचा सहभाग ४५% आहे.अधिक माहीतीसाठी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आय.टी.आय च्या मागे एल.आय.सी ऑफिस रोड,गडचिरोली येथे स्वत: संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

भोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होताच अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.विधीच्या नावाने अनेक उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!