Friday, April 17, 2026
Homeनागपूरशेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले.. - उद्याला उत्तरासह हजर होण्याचा...

शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले.. – उद्याला उत्तरासह हजर होण्याचा दिला आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारीवाल पॉवर स्टेशनच्या पाणी पाइपलाइनमुळे दरवर्षी लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान होत आहे.हा अतिशय गंभीर विषय असतांनाही चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये उत्तर सादर केले नाही.त्यामुळे न्यायालयाने काल बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना फटकारून उद्या,शुक्रवारी ६ डिसेंबरला उत्तरासह हजर होण्याचा आदेश दिला आहे.
यासंदर्भात अंतुर्ला येथील अशोक कौरासे व इतर चार पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.जल संसाधन विभागाने ६०० मेगावॅट क्षमतेच्या धारीवाल पॉवर स्टेशनला दरवर्षी वर्धा नदीमधील १९.२६ क्युबिक लिटर पाणी वापरण्यास,तर जिल्हाधिकाऱ्यांनी पॉवर स्टेशनपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन टाकण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार,धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने धानोरा,वढा,पांढरकवडा,महाकुर्ला,अंतुर्ला,शेणगाव, सोनेगाव,येरूर व गवराळा या गावांमधील शेतातील शिवधुऱ्यावरून सुमारे २० किलोमीटर लांब पाइपलाइन टाकली आहे.ही पाइपलाइन अनेकदा फुटते.त्यामुळे शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान होते.यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी केल्या, पण त्यांनी दखल घेतली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकील ॲड.शिल्पा गिरटकर यांनी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जबाबदारीने वागत नाही; असा आरोपही केला.पाइपलाइनची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.परंतु,ही कंपनी याकडे नियमित लक्ष देत नाही.वर्षातून केवळ एकदाच देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाते,याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर ओळख; बोलणे बंद करताच अश्लील फोटो व व्हिडीओ क्लिप केले व्हायरल.. – आरोपी तरुणास बेड्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २६ वर्षीय तरुणाची सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर १९ वर्षीय तरुणीशी ओळख झाली.दोघांचेही स्नॅपचॅटवर चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगदरम्यान तरुण हा आपल्या नातेसंबंधातीलच...

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!