Friday, June 19, 2026
Homeनंदुरबाररस्त्या अभावी जीवघेणा प्रवास...! गरोदर महिलेचा रस्त्यातच झाला पाच महिन्याचा गर्भपात..

रस्त्या अभावी जीवघेणा प्रवास…! गरोदर महिलेचा रस्त्यातच झाला पाच महिन्याचा गर्भपात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नंदुरबार :-नंदुरबार जिल्हा हा आदिवासी,बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो.जिल्हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने आजही जिल्ह्यातील अनेक गाव-पाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता नाही.यात वाहन जाणे तर दूरच,दरम्यान रस्ता नसल्याने पायपीट करतच रुग्णालय गाठावे लागते.गरोदर महिलांना कित्तेकदा बांबूची झोळी करूनच न्यावे लागत असते.असाच प्रकार आज,सोमवारी १८ नोव्हेंबरला उघडकीस आला असून यात महिलेचा रस्त्यातच गर्भपात झाल्याचा प्रकार घडला आहे.
विधानसभेत कोट्यावधीच्या विकासाच्या गोष्टी सत्ताधारी आणि विरोधकांकडून केल्या जातात.मात्र,आज रस्ता नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेहगीच्या बारीपाडा मधल्या एका गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भापत झाल्याची घटना समोर आली आहे.रस्ता नसल्याने या महिलेला साडेआठ किलोमीटर बांबुची झोळी करुन मुख्य रस्त्यावर नेले जात होते.रुग्णवाहीका नसल्याने खाजगी गाडीतून पिपंळखुटाच्या रुग्णालायत नेले जात होते. दरम्यान,रस्त्यातच गाडी पाण्यातील चिखलात फसली. त्यामुळे गाडी बाहेर काढण्यासाठी बराच वेळ गेला. परिणामी,रस्त्यातच महिलेचा पाच महिन्याचा गर्भपात झाला.यानंतर तिला पिपंळखुटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या स्थितीत महिलेची प्रकृती बरी आहे.पाड्याला ग्रामपंचायत मातीचा रस्ता करुन देते.मात्र, पावसाळ्यात हा रस्ता वाहून जात असल्याने पावसाळा आणि हिवाळ्यात रस्त्याअभावी जीवघेणा प्रवास महिलांना करावा लागतो आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!