उद्रेक न्युज वृत्त :-मद्रास उच्च न्यायालयाने एका तरूणावर लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली कलम ३५४ अ अंतर्गत सुरू करण्यात आलेली फौजदारी कारवाई रद्द केली.प्रियकर-प्रेयसीने एकमेकांना मिठी मारणे आणि किस करणे स्वाभाविक तसेच नैसर्गिक गोष्ट आहे.कोणत्याही प्रकारे हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अ अंतर्गत गुन्हा असू शकत नाही; असे निरीक्षण नोंदवत लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करणाऱ्या तरुणाला दिलासा दिला आहे.याचिकेवर सुनावणी करणारे न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश यांनी म्हटले की,लैंगिक छळाचा गुन्हा ठरवण्यासाठी एखाद्या पुरुषाकडून शारीरिक संबंध आवश्यक आहे; जे अस्वीकार्य आहे आणि त्यात स्पष्ट लैंगिक क्रियाकलाप आहेत.न्यायालयाने नमूद केले की,सध्याच्या प्रकरणात तरूण आणि तरूणी यांच्यातील प्रेमसंबंध मान्य केले गेले होते. पौगंडावस्थेत प्रेमसंबंध असलेल्या दोन व्यक्तींमध्ये मिठी मारणे किंवा चुंबन घेणे स्वाभाविक आहे. प्रकरण असे की, लैंगिक छळ प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा; अशी मागणी करणारी याचिका संतगणेश नावाच्या एका तरुणाने केली होती. आयपीसीच्या कलम ३५४-ए (१) (आय) अंतर्गत त्याच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला होता. प्रेमसंबंध असलेल्या फिर्यादी तरूणीला याचिकाकर्त्या तरूणाने १३ नोव्हेंबर २०२२ रोजी एका ठिकाणी भेटायला बोलावले होते.त्यानंतर दोघांमध्ये जवळीकता आली होती.
प्रेमसंबंध असलेल्या दोन व्यक्तींमध्ये मिठी मारणे किंवा चुंबन घेणे स्वाभाविक आहे; याला गुन्हा म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

