Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीकायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी...

कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात १५ ऑक्टोंबर  २०२४ पासून आदर्श आचार संहिता लागु झालेली असुन गडचिरोली जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदार संघात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान व २३ नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होणार आहे.तसेच काही विविध राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे,आंदोलने,सभा,मिरवणुक,सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने तसेच निवडणूक अनुषंगाने विविध राजयकी पक्ष,संघटना कडून उमेदवारांचे प्रचारार्थ रॅली व जनसंपर्क अभियान जास्तीत जास्त करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा  सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक-१२ नोव्हेंबर २०२४ चे ००.०१ वाजता ते दिनांक-२६ नोव्हेंबर २०२४ चे २४.०० वाजता पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ चे कलम ३७ (१)(३) लागु  करण्यात आलेले आहे.त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक-१२ नोव्हेंबर २०२४ चे ००.०१ वाजता ते दिनांक-२६ नोव्हेंबर २०२४  चे २४.०० वाजता पर्यंत या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे. शस्त्र,सोटे,तलवारी,भाले,दंडे,बंदुका,सुरे,काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल,अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,जाहीरपणे घोषणा करणे,गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे,ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल,अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे,अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे,चिन्हे,फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे.उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही सभा,मोर्चा,उत्सव व मिरवणूक काढू नये,पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही.सदर आदेश संपुर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या क्षेत्राकरीता लागु राहील,असे जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!