Friday, October 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान...! गॅस सिलेंडर वजन करूनच खरेदी करा; सिलेंडरमध्ये तब्बल अडीच किलो गॅस...

सावधान…! गॅस सिलेंडर वजन करूनच खरेदी करा; सिलेंडरमध्ये तब्बल अडीच किलो गॅस असते कमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा-केव्हा आपण घरगुती गॅस वा व्यावसायिक गॅस सिलेंडर खरेदी करतो,अशावेळी गॅस एजन्सी धारक सिलेंडर वजन करून तर देतच नाही व आपणही अंगाला हळद लावून घेत नाही. मात्र,गॅस सिलेंडर खरेदी करतांना गॅस वजन काट्यावर मोजमाप करून देणे अनिवार्य आहे व तसा नियमही आहे.सिलिंडर घेतांना वजन करा.आपल्या सिलिंडरमध्ये तब्बल अडीच किलो गॅस कमी असते.गोंदियात गॅसचा काळा बाजार करणारे रॅकेट सक्रिय असल्याची विश्वसनीय माहिती आहे.नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे.घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची तपासणी करून वजन केल्यास गॅस चोरी होत असल्याचा दाट संशय आल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येक सिलिंडरमध्ये दोन ते अडीच किलो गॅस कमी असल्याची जोरदार चर्चा शहरासह जिल्ह्यात आहे.
गॅस सिलिंडर देताना ग्राहकांना त्याची पावती देणे अपेक्षित असतांना सिलिंडरसोबत ग्राहकांना पावती दिली जात नाही.यावर तहसील कार्यालयातून काहीच कारवाई केली जात नाही.गॅस सिलिंडर वाटप करणाऱ्या व्यक्तींनी वजनकाटा व गॅस लिकेज मशीन सोबत ठेवणे अपेक्षित असताना गॅस सिलिंडर वाटप करणाऱ्यांकडे वजनकाटा व लिकेज मशीन उपलब्ध राहत नाही.त्याची अधिकाऱ्यांनी सक्ती करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!