Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीविधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज.. - गडचिरोली विधानसभा क्षेत्र; ईव्हीएम प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण..

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज.. – गडचिरोली विधानसभा क्षेत्र; ईव्हीएम प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे.दिनांक-२६ व २७ ऑक्टोंबर रोजी ईव्हीएम यंत्र हाताळण्याच्या प्रात्यक्षिकासह मतदान प्रक्रिया संबंधीचे पहिले प्रशिक्षण गडचिरोली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडले.
६८-गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली,धानोरा व चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३६२ मतदान केंद्र असून एकूण १ हजार ८१९ मतदान अधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेत नेमणूक करण्यात आली आहे. प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी कंट्रोल युनिट,बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे कौशल्य जाणून घेतले.यावेळी मतदान प्रक्रियेतील मतदान अधिकारी,केंद्राध्यक्ष यांना नेमून दिलेले कामकाज,कर्तव्य व जबाबदाऱ्यांची जाणीव प्रशिक्षणात करून देण्यात आली.मतदान केंद्र तयार करणे,मतदानाची पूर्वतयारी,मतदान युनिट तयार करणे,नियंत्रण युनिट तयार करणे,अभिरुप मतदान घेणे,कागदी मोहर लावणे,प्रत्यक्ष मतदानासाठी मतयंत्र तयार करणे,मतदारांची ओळख पटविणे,प्रदत मत,आक्षेपित मत,मतदान प्रक्रिया संबंधित कायदे, विविध प्रपत्रे व संपूर्ण मतदान प्रक्रिये बाबत विस्तृत माहिती देण्यात आली.प्रशिक्षणार्थींच्या मनात उपस्थित झालेल्या शंका व प्रश्नांचे निराकरण यावेळी करण्यात आले.
प्रशिक्षण स्थळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चामोर्शी अमित रंजन,गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर,धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड,चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे,गडचिरोलीचे नायब तहसीलदार अमोल गव्हारे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे,नायब तहसीलदार चंदू प्रधान,अनिल सोमनकर,महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!