Saturday, August 22, 2026
HomeUncategorizedमोठी बातमी,भारताने चीनच्या १३८ जुगार आणि ९४ कर्ज देणाऱ्या ॲप्सवर घातली बंदी

मोठी बातमी,भारताने चीनच्या १३८ जुगार आणि ९४ कर्ज देणाऱ्या ॲप्सवर घातली बंदी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मोदी सरकारने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. कर्ज देणाऱ्या आणि ऑनलाईन बेटिंग ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रलयाने ॲप्सवर कारवाई केली आहे. भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला बांधा निर्माण होत असल्याचा आरोप करत १३८ ऑनलाईन जुगाराचे आणि ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ९४ ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

हे सर्व ॲप चीनशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.आयटी ॲक्टच्या कलम ६९ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआयने माहिती दिल्यानुसार केंद्रीय गृहखात्याने या आठवड्यात केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि प्रसारण (MeitY) मंत्रालयाला ॲप्सवर बंदी घालण्यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता.सामान्य लोकांची लुबाडणूक,जबरदस्तीने केलेली वसूली आणि छळवणूक याच्या तक्रारी वाढल्यानंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.अनेकांनी या ॲप्सच्या माध्यमातून कर्ज घेतले होते.मात्र त्यानंतर वसूलीसाठी कर्ज घेणाऱ्यांचा छळ केला जात होता.

कर्ज देणारे किंवा ऑनलाईन बेटिंग करणारे अनेक ॲप्स हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत.थर्ड पार्टी लिंक देऊन एपीके फाईलद्वारे असे ॲप्स डाऊनलोड केले जातात. यापैकी अनेक ॲप्सची जाहीरात सोशल मीडियावरुन केली जाते.टोरंट साईट्स किंवा डार्क वेबच्या साईटला भेट दिली असता तिथेही या ॲप्सच्या जाहीराती दिसतात. जाहिरातीवर क्लिक केल्यास ॲप डाऊनलोड व्हायचे.माहिती व प्रसारण खात्याने माहिती देताना सांगितले की,भारताच्या अनेक भागात बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर आहे.त्याची जाहीरात करणे देखील ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार बेकायदेशीर आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात...

आता पोलीस दलातून निवृत्त होणारे श्वान राहणार पोलीस दलाचाच भाग..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस  दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.यापुढे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्वान पोलीस दलाच्या सेवेतून...

घरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिस व पुरवठा शाखेच्या संयुक्त पथकाने दोघांना ताब्यात घेत अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा...

वाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम – राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकी पेशातून समाजसेवेच्या व्यापक क्षेत्रात आणि तेथून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!