- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथील सात नागरिकांनी बँकेतून कर्ज घेऊन अगरबत्ती यंत्र खरेदी केले होते.यंत्र खरेदी केले खरी,पण सुरूच होत नसल्याने सातही नागरिकांनी जिल्हा ग्राहक मंचात धाव घेत तक्रार दाखल केली.प्रकरणी आयोगात सुनावणी पार पडली.यात गोंदिया जिल्हा ग्राहक मंचाने गुजरातच्या सुरत येथील मेसर्स कृष्णा इंजिनिअरिंग कंपनीला सात ग्राहकांना तब्बल १ लाख २९ हजार ८०० रुपये व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत.अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथील रहिवासी दीपाली नरेंद्र भोयर,नेहा नागेश्वर वासनिक,सविता प्रदीप वासनिक,सुनीता घनश्याम नागपुरे,ज्योती दुलीचंद गहाणे,छाया केदार गहाणे आणि नाशिका यशवंत बावणे यांनी अर्जुनी-मोरगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून कर्ज घेऊन संयुक्तपणे अगरबत्ती यंत्र खरेदी केले होते.जिल्हा वितरक गोंदिया कटंगी येथील विनय अगरबत्ती सेंटरने हे यंत्र पुरवले होते.या यंत्रांची उत्पादक कंपनी सुरत येथील मेसर्स कृष्णा इंजिनिअरिंग कंपनी होती.कृष्णा ब्रँड अंतर्गत उत्पादन करणारी कृष्णा इंजिनिअरिंग ही कंपनी खरेदी केलेल्या मशीन्स सुरू करण्यात अयशस्वी झाली.
दुरुस्तीसाठी अभियंत्यांना अनेक वेळा बोलावण्यात आले,परंतु,तरीही मशीन्स सुरू होऊ शकल्या नाहीत. दरम्यान,बँकेने कर्जाची परतफेड करण्याची मागणी सुरू केली.त्यातच,कंपनीने हात वर करून रक्कम परत करण्यास नकार दिला.लागलीच सात नागरिकांनी जिल्हा ग्राहक तक्रार धाव घेत खटला दाखल केला.यात कंपनी दोषी आढळल्याने ग्राहकांच्या बाजूने निकाल लागला आणि कंपनीला व्याजासह रक्कम परत करण्याचा आदेश आयोगाने दिला.
- Advertisement -

