- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या गनिमी काव्यामुळे तसेच हिंसक कारवायांमुळे अगोदरच नागरिक भयभीत होऊन कुठलीही ‘रिस्क’ घ्यायला तयार नसतांनाच एक भयभीत करणारी घटना जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या भामरागड शहरालगतच्या पर्लकोटा नदी काठावर काल शनिवारी घडली.त्यामुळे तब्बल पाच तास वाहतूक विस्कळित तर झालीच, अश्यातच जिल्ह्याचे प्रशासन तात्काळ ॲक्शन मोडवर येत पोलिस विभागाच्या बॉम्ब शोध पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.महत्वाचे म्हणजे,गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ संशयास्पद वस्तूची माहिती मिळताच,बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पाठवून शोध मोहीम राबविण्यात आली. परंतु बांधकामादरम्यान वायर पडल्याचे तपासात उघड झाले.चौकशीदरम्यान वाहतूक थांबवावी लागली. यापूर्वीही सदर पुलावर अशी घटना उघडकीस आल्याने ही सतर्कता बाळगण्यात आली होती.जिल्हा पोलिस दल नागरिकांच्या संरक्षणासाठी नेहमीच सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भामरागड शहरालगत असलेल्या पर्लकोटा नदी पुला लगत बॉम्ब असल्याची अफवा सर्वत्र पसरली.यामुळे भामरागड वासीयांसह वाहतूकदारांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली.या प्रकरणाची माहिती मिळताच भामरागड पोलिसांनी तपास सुरू केला.तपासादरम्यान,संशयास्पद वायर दिसल्यानंतर,गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले.सदर पथकाद्वारे शोध मोहीम सुरू करण्यात आली.त्यामुळे भामरागड आलापल्ली रस्त्यावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली.या प्रकारामुळे भामरागडवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.बॉम्ब निकामी पथकाने घटनास्थळी कसून शोधमोहीम राबवली असता कोणतेही स्फोटक पदार्थ आढळून आले नाही. बांधकामादरम्यान वायर पडल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.मात्र,बॉम्बच्या अफवेने तपासणीदरम्यान जवळपास तब्बल पाच तास भामरागड-आलापल्ली मार्गावरील बंद ठेवलेली वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली.
- Advertisement -

