Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीशीवणी गावाला घराघरात शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा..

शीवणी गावाला घराघरात शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गडचिरोली यांच्या वतीने मौजा-शीवणी,
ता.गडचिरोली येथे आज,मंगळवार २४ फेब्रुवारीला जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा जल अर्पण सोहळा उत्साहात पार पडला.गावकऱ्यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या साक्षीने आयोजित या सोहळ्यामुळे शीवणी गावाला घराघरात शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उददरवार,उपविभागीय अभियंता नितीन पाटील,गट विकास अधिकारी अनिकेत पाटील यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थ,महिला,युवक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सोहळ्याची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शीवणी व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रभातफेरीने झाली.विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन आणि स्वच्छ पाण्याच्या महत्त्वाविषयी घोषणाबाजी करत गावात जनजागृती केली.नव्याने उपलब्ध झालेल्या नळपाण्याचे मंगल कलश डोक्यावर घेऊन महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला,तर युवक व ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले.यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले आणि सर्व उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेत जलसंवर्धनाचा संदेश दिला.ग्रामस्थ महिलांनी आणलेल्या जलकलशाचे पूजन गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जल अर्पण सोहळ्याची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान उपविभागीय अभियंता नितीन पाटील यांनी योजनेची सविस्तर तांत्रिक माहिती दिली. प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून स्वच्छ पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असल्याचे अधोरेखित करत जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागात जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत पदाधिकारी व महिलांनीही मनोगत व्यक्त करून शासनाचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा गोहणे यांनी केले,तर कनिष्ठ अभियंता निर्भय करेवार यांनी आभार प्रदर्शन केले.ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग,जिल्हा परिषद शाळा शीवणी,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!