Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरवाघाने पाठलाग केला अन् जिवाच्या आकांताने पळत सुटला.. - गंभीर जखमी शेतकरी...

वाघाने पाठलाग केला अन् जिवाच्या आकांताने पळत सुटला.. – गंभीर जखमी शेतकरी तपासणीअंती मृत घोषित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शेतात कामे करीत असतांनाच अचानकपणे वाघाने हल्ला चढवला.हल्ला चढवताच जिवाच्या आकांताने पळत सुटून गंभीर जखमी झाला,तरीही वाघाने पाठलाग केला.परिसरातील नागरिक मदतीला धावले आणि रुग्णालयात दाखल करताच शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची चित्तथरारक घटना काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजे सुमारास उमरेड वनपरिक्षेत्रातील भिवगड शेत शिवारात घडली.भिवा भाऊराव चौधरी वय ४२ वर्षे,रा.भिवगड,ता.उमरेड,जि.नागपूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
भिवा चौधरी यांच्याकडे भिवगड येथे पाच एकर शेती आहे.शेत शिवारातील संपूर्ण परिसर जंगलाने वेढला आहे.काल शुक्रवारी भिवा चौधरी हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत होते.अशातच सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला केला.भिवा चौधरी जिवाच्या आकांताने पळत सुटले आणि आरडाओरड करू लागले.वाघाने पाठलाग केल्यानंतर यामध्ये भिवा चौधरी जखमी झाले.शेतालगतच असलेले रमेश सनेसर, बळीराम चौधरी या दोघांना आरडाओरड लक्षात येताच मदतीसाठी धावले.मदतीसाठी धावताच वाघ जंगलाच्या दिशेने पळाला.हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले भिवा चौधरी यांना तातडीने उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.गावकऱ्यांना नेहमीच वाघ आणि अन्य हिंस्र प्राण्यांचा त्रास होत आहे.शेतीचेही प्रचंड नुकसान सोसावे लागते.प्रकरणी आज,शनिवार ३० ऑगस्टला आमगाव नाका येथे ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!