Friday, April 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाचखोर अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही...महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

लाचखोर अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही…महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला लाच घेण्याचे प्रमाण वाढले असून महसूल सप्ताह सुरू असतांना एक तहसीलदार लाच घेतो; ही शरमेची बाब आहे. लाच घेताना पकडलो गेलो; याची भीती वा कोणते सोयरसुतकच या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटत नाही.तीन-चार महिन्यांत पुन्हा कामावर रुजू होतात. लाच घेतल्यानंतर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कारवाईच्या नियमात बदल करावा लागेल; अशी गरज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.विखे पाटील यांनी मंगळवारी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा आढावा घेतला.त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आमदार संग्राम जगताप,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील,भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) विठ्ठल लंघे आदी उपस्थित होते.
राज्यभरात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. त्यात गोरगरीब जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्याचे काम सुरू होते.अशा परिस्थितीत नाशिक येथील एक तहसीलदार लाचेच्या जाळ्यात सापडला. याकडे विखे पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले. महसूल सप्ताहात तहसीलदाराचे हे कृत्य अतिशय शरमेची बाब आहे. अधिकारी व कर्मचारी लाच घेतात.पकडल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा कामावर रुजू होतात. केलेल्या कृत्याचे त्यांना सोयरसुतक नसते. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई आवश्यक आहे. त्यासाठी नियमात बदल करावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून नियमात बदल करावा लागेल. तरच या भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे विखे यांनी नमूद केले.महापुरुषांबाबत गरळ ओकण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनाने प्रत्येक घटनेची दखल घेतली आहे. कारवाई सुरू आहे. कोणाला पाठीशी घातले जाणार नाही. संभाजी भिडेंबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.त्यामुळे याबाबत मी बोलणार नाही, असे विखे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ३० हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डीत ११ ऑगस्टला कार्यक्रम होत आहे. लाभार्थ्यांना ने आण करण्यासाठी सहाशे बसची व्यवस्था केली आहे.हा कार्यक्रम नगर येथे घेण्याचे नियोजन होते. परंतु पाऊस आणि हवामान बदलाचा विचार करून शिर्डीला कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमाला किती खर्च येणार हे महत्त्वाचे नाही, तर गोरगरीब जनतेला लाभ मिळावा हा उद्देश असल्याचे महसूलमंत्री विखे यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!