Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहिला विश्वचषक विजेत्या संघाला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर..!

महिला विश्वचषक विजेत्या संघाला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या काल रविवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारताने ७ विकेट गमावल्यानंतर २९८ धावा करून दक्षिण आफ्रिकेला २९९ धावांचे लक्ष्य दिले होते.मात्र,भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजून भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेता बनला.विजयाने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पसरले आणि रात्रीच्या सुमारासच सर्वत्र जल्लोष साजरा करून मोठा उत्सव साजरा करण्यात आला.दुसरीकडे,विजयानंतर क्रिकेट बोर्डाकडून संघाला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते माजी खेळाडूंपर्यंत सर्वांनी संघाचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शानदार विजय.अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी अविश्वसनीय कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती.संपूर्ण स्पर्धेत संघाने असाधारण टीमवर्क आणि चिकाटी दाखवली. खेळाडूंचे अभिनंदन.हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना खेळात रस घेण्यास प्रेरणा देईल.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!