Wednesday, June 3, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरी तालुक्यातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी रहस्यमयरित्या बेपत्ता..!

ब्रम्हपुरी तालुक्यातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी रहस्यमयरित्या बेपत्ता..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-गेल्या तीन ते चार दिवसांपासून इयत्ता दहाव्या वर्गात शिकणारा १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने आईवडील चिंताग्रस्त झाले आहेत.संतोष अरविंद सहारे,रा.तळोधी खुर्द,ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो गांगलवाडीच्या लोक विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे.संतोष हा मंगळवारी शाळेत गेला नसल्याने आईने समज देऊन त्याला शाळेत जाण्यासाठी सांगितले होते.परत दुसऱ्या दिवशी बुधवारी १७ सप्टेंबरला मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत जाणार म्हणून त्याला काहीही न बोलता आईवडील कामासाठी बाहेर पडले.सायंकाळी कामावरून परत आल्यानंतर संतोष घरी नसल्याने गावात वास्तव्यास असणारी आजी, शाळेतील मित्र तसेच इतर नातेवाइकांकडे चौकशी करून शोधाशोध केली.शोधाशोध करूनही संतोषचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.त्यानुसार ब्रम्हपुरी पोलिसांकडून संतोषचा शोध सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!