Friday, October 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबँकांना ३५ हजार कोटी रुपयांचा वालीच सापडेना....!- पैश्याचा वाली नसल्यास बँका काय...

बँकांना ३५ हजार कोटी रुपयांचा वालीच सापडेना….!- पैश्याचा वाली नसल्यास बँका काय करतात? घ्या जाणून…. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या परिस्थितीत असा एकही व्यक्ती सापडणार नाही की,ज्यांचे बँकेमध्ये खाते नाही.लहानांपासून तर वयोवृद्ध यांची बँक खाती असतातच.बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित मानले जाते. काबाळकष्ट करून व पोटाची आतडी मारून लोक बँकेत पैसा ठेवतात.अशातच काहीजण बँकेत तर पैसा ठेवतात; मात्र त्यांना माहितीच नसते किंवा आठवण येते किंवा नाही की,आपला बँकेत पैसा आहे.कितीतरी वर्षे उलटूनही काहीजण ठेवलेल्या पैशाला हात लावत नाही.अशीच बाब निदर्शनास आली असून नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम ३५ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला फेब्रुवारी मध्ये दिली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी संसदेत दिली आहे.

खरे म्हणजे असे पैसे ज्यांच्यावर कुणीही दावा केलेला नाही.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेला लिखित स्वरुपात ही माहिती दिली.सदर ३५,०१२ कोटी रुपयांचा कोणीही दावेदार नसलेली सर्वाधिक रक्कम स्टेट बँकेत आहे.स्टेट बँक ऑफ इंडियात असे ८,०८६ कोटी रुपये आहेत.तर पंजाब नॅशनल बँकेत असे ५,३४० कोटी रुपये आहेत. कोणीच दावा न केलेले ४,५५८ कोटी रुपये कॅनरा बँकेमध्ये आहेत तर बाकीची. रक्कम इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, बचत आणि चालू खात्यात असलेल्या रकमेबद्दल १० वर्षे कोणीही विचारणा न केल्यास ती रक्कम ‘दावा न केलेली रक्कम’ मानली जाते. अनेक जण बँकेत ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेवतात. त्याला मुदत ठेव मानले जाते.ठराविक कालावधी संपल्यानंतर १० वर्षांनंतरही त्या रकमेवर दावा करण्यास कोणीही पुढे न आल्यास त्या रकमेला ‘अनक्लेम्ड डिपॉझिट’ समजले जाते.सदर रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ‘डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयनेस फंडा’त जमा केली जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!