- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीची अंतिम मुदत कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० ऑगस्ट तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरिता १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.खरीप हंगाम २०२५ अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी करण्यासाठी आधीची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ होती.या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि तांत्रिक बाबींमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करणे शक्य झाले नाही.ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करून मुदतीत नोंदणी करावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
- Advertisement -

