Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील अकराव्या सत्रात नागपूर येथील ज्येष्ठ कवी चरणदास वैरागडे विजयी…

नाट्यश्री कविता स्पर्धेतील अकराव्या सत्रात नागपूर येथील ज्येष्ठ कवी चरणदास वैरागडे विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.सदर उपक्रमाचे अकरावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २४ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात नागपूर येथील ज्येष्ठ कवी चरणदास वैरागडे या कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  “मोगरा ” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

चरणदास वैरागडे हे नागपूर येथील ज्येष्ठ कवी असून त्यांच्या ‘नाद पैंजनांचा’ हा कवितासंग्रह व ‘आर्त कथांची सार्थकता’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. विविध वृत्तपत्रांतून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात.  ते सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अकराव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  जयराम घोंगडे, प्रशांत गणवीर,माधुरी अमृतकर,पुरुषोत्तम लेनगुरे, विलास जेंगठे,गणेश रामदास निकम, भारत झाडे, संजय बन्सल,चरणदास वैरागडे,उपेंद्र रोहनकर, हरिष नैताम,गजानन गेडाम, संतोष कपाले, बाबाजी व्ही. हुले, प्रभाकर दुर्गे,रेखा दिक्षित, ज्योत्स्ना बन्सोड, तुळशीराम उंदीरवाडे, सुजाता अवचट,सौ.प्रतिभा सुर्याराव  इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

– चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!