Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीधानोरा तालुक्यातील सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांची विकासाकडे वाटचाल... - १५ हेक्टर...

धानोरा तालुक्यातील सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांची विकासाकडे वाटचाल… – १५ हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड कार्यक्रम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांची विकासाकडे वाटचाल सुरू असून आज,२ एप्रिल रोजी धानोरा तालुक्यातील सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा येरकड व ढवळी येथे १५ हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचे कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली रोजगार हमी योजना शाखेचे कुंभारे व श्याम गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
लागवड कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामसभा येरकड आणि ढवळीतील स्थानिक ग्रामस्थांसाठी सामूहिक वन हक्क (CFR) अंतर्गत बांबू लागवडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व पर्यावरणीय समृद्धी साधणे असून स्थानिक गावकऱ्यांना वन व्यवस्थापन, लागवड आणि संवर्धन यासंबंधी प्रशिक्षण देऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना  प्रकल्पाचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.सामूहिक वन हक्क क्षेत्रात बांबू लागवड हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून,या माध्यमातून पर्यावरणाची रक्षा,जमिनीचे संवर्धन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.यामुळे स्थानिक बेरोजगारी कमी होईल तसेच वनसंवर्धनाला गती मिळेल.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदविला व या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी पाठिंबा दर्शविला.हा उपक्रम स्थानिक समुदायाच्या सहभागाने पर्यावरण व रोजगाराच्या क्षेत्रात एक सकारात्मक पाऊल म्हणून गणला जात आहे.
सदर बांबू लागवड कार्यक्रमास सहाय्यक कार्यक्रम अधिकारी किरण गाजलवार (APO),डाटा एन्ट्री ऑपरेटर निशा,तांत्रिक अधिकारी भानारकर (TPO),कुणाल गुरनूले (सृष्टी संस्था,येरंडी),परसराम कोवाची (ढवळी), विनोद कोवाची (अध्यक्ष,ग्रामसभा ढवळी), चंद्रशहा तुलावी (सचिव,ग्रामसभा ढवळी),गजानन काटेंगे (अध्यक्ष,ग्रामसभा येरकड),सतीश जनबंधू (मेट),मनोज चव्हाण (मास्टर ट्रेनर),धनंजय ठाकरे (समन्वयक) डंकलवार (RO,दक्षिण धानोरा) तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!