Tuesday, August 25, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तर्फे गरबा फेस्टिव्हल  उत्साहात साजरा…..

देसाईगंज युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तर्फे गरबा फेस्टिव्हल  उत्साहात साजरा…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- येथील युनिव्हर्सल कॉन्व्हेंटच्या वतीने गरबा फेस्टिव्हल काल दिनांक-२२ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.सर्वप्रथम देसाईगंज युनिव्हर्सल कॉन्व्हेंट येथील उपस्थित शाळेचे संस्थापक बी.पी.पडवेकर,शाळेचे मुख्याध्यापक पंकज डी.मेश्राम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाई यांच्या प्रतिमेस माल्यारर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.गरबा फेस्टिव्हल २०२३ चे औचित्य साधून युनिव्हर्सल कॉन्व्हेंटच्या विध्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून गरबा नृत्य सादर केले.विविध गाण्यांच्या तालावर ठेका घेत गरबा नृत्य सादर करून कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी पालक व प्रेक्षकांची मने जिंकली.शाळेतील संपूर्ण परिसर गरबा फेस्टिव्हलने गुंजून गेले होते.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात व हर्शोल्हात खेळी-मेळीचे वातावरण तयार करून गरबा नृत्याचे पाहिले वर्ष साजरे केले आहे.

सदर कार्यक्रमास शाळेचे संस्थापक बी.पी.पडवेकर, शाळेचे मुख्याध्यापक पंकज डी.मेश्राम व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास पालक वर्गाने उत्फुतपणे सहभाग घेऊन  कलेचे प्रदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे संचालन हर्षद सोनपिपरे यांनी केले तर महेश दिवठे यांनी आभार मानले.गरबा फेस्टिव्हल कार्यक्रमाला सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले तसेच सर्व शिक्षकांचे,विध्यार्थ्यांचे व पालकांचे युनिव्हर्सल कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आभार मानले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!