Tuesday, July 28, 2026
Homeनागपूर'झुंड' चित्रपटात काम करणाऱ्या तरुणाची हत्या..!

‘झुंड’ चित्रपटात काम करणाऱ्या तरुणाची हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-तीन वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असणारे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटात काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारच्या मध्यरात्री जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छेत्री वय २१ वर्षे, रा.लुंबिनी नगर,मेकोसाबाग,नागपूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर विविध गुन्हे दाखल होते.तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता.सदरची हत्या ही वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.प्रकरणी पोलिसांनी एका  ध्रुव शाहू नामक संशयित आरोपीला अटक केली आहे.
मंगळवार ७ ऑक्टोंबरच्या रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास बाबू हा त्याच्या एका मित्रासोबत बाहेर गेला होता.पण रात्र होऊनही तो घरी परतला नव्हता.अश्यातच जरीपटका पोलिसांना मध्यरात्री कुणाची तरी हत्या झाल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून एक मुलगा वायरने बांधलेला तसेच शरीरावर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे व्रण असल्याचे दिसून आला.लागलीच पोलिसांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले.मात्र,उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.सुरुवातीला तो कोण आहे; याची कल्पना पोलिसांना नव्हती.मृताबद्दलची माहिती घेतल्यावर तो बाबू छेत्री असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.त्यानंतर पोलिसांनी बाबूच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.बाबू छेत्री याच्यावर यापूर्वीही काही इतर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल होते.प्रियांशुची बहीण शिल्पा क्षत्रियने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून एका संशयितास ताब्यात घेतले आहे.झुंड’ हा चित्रपट विजय बारसे या निवृत्त शिक्षकाच्या आयुष्यावर आधारित होता. याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते आणि चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती.चित्रपटात नागपुरातील झोपडपट्टीतील काही मुलांना अभिनयाची संधी देण्यात आली होती. त्यातील एक बाबू होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!