उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- तीन दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे.पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने नदी,नाले भरभरून वाहू लागले आहेत.अनेक गावांतील संपर्क तुटल्या गेले आहे.अशातच आता आजपासून पाच दिवस गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचे येलो अलर्ट दिले आहे.येलो अलर्ट नुसार एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस,विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची संभावना दिनांक – आज,२२ जुलै ते २६ जुलै पर्यंत हवामानविभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ३३ मार्ग बंद झाली आहेत.त्यामध्ये
१) आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला,)ता.भामरागड
२) अहेरी मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला ता. अहेरी
३) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलाकर्जी ते रेपनपल्ली भाग) छल्लेवाडा ते कमलापुर मार्गाने पर्यायी वाहतूक सुरू ता. अहेरी
४) जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा
५) पोर्ला वडधा रस्ता ता.कुरखेडा
६) वैरागड कुरखेडा रस्ता ता.कुरखेडा
७) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला ता. चोमोर्शी
८) भेंडाळा अनखोडा रस्ता ता.चामोर्शी
९) मुल हरणघाट रस्ता दहेगाव नाला ता.चामोर्शी
१०) चांदेश्र्वर टोला रस्ता ता. चामोर्शी
११) फोर्कुडी मारकंडादेव रस्ता ता.चामोर्शी
१२) आंधळी कुरखेडा रस्ता ता.कुरखेडा
१३) रामगड उरांडी रस्ता ता.कुरखेडा
१४) भाडभिडी रेगडी देवदा रस्ता ता. चामोर्शी
१५) कोनसरी जामगड रस्ता ता.चामोर्शी
१६) चामोर्शी फराळा मार्कडादेव ता.चोमोर्शी
१७) गडचिरोली आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ता. गडचिरोली
१८) आलापल्ली आष्टी ता.अहेरी
१९) कंबालपेठा पुसुकपल्ली ता.सीरोंचा
२०) तळेगाव चारभट्टी ता. कुरखेडा
२१) काढोली ते सावलखेडा ता.कुरखेडा
२२) मुत्तापुर माल रस्ता ता.सिरोंचा
२३) कुरखेडा वैरागड रस्ता ता. कुरखेडा
२४) वैरागड देलनवाडी रस्ता ता.आरमोरी
२५) ठाणेगाव वैरागड रांगी रस्ता ता.आरमोरी
२६) आरमोरी अंतरंगी जोगिसाखरा रस्ता ता. आरमोरी
२७) मानापुर नंदा कलकुली रस्ता ता. आरमोरी
२८) बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता ता. सिरोंचा
२९) कोरची बोटेकसा रस्ता ता. कोरची
३०) मौसिखांब वडधा रस्ता ता. वडसा
३१)सोमनपल्ली जाफराबाद रस्ता सोमनुर नाला ता. सिरोंचा
३२) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ता. गडचिरोली
३३) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता ता.सिरोंचा

