Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियाक्षुल्लक कारणावरून पतीशी झाला वाद अन् पत्नीने घेतला गळफास……

क्षुल्लक कारणावरून पतीशी झाला वाद अन् पत्नीने घेतला गळफास……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- नवेगावबांध पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कवठा येथील शेतशिवारात ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता एक महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. निवृत्ता चंद्रशेखर रामटेके वय ४० वर्षे रा.बोळदे-कवठा असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे.

२९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता तिचे पती चंद्रशेखर पांडुरंग रामटेके वय ४६ वर्षे हे बाहेरून घरी आल्यावर आपल्या मुलाला आंघोळीसाठी पाणी गरम कर,असे त्यांनी म्हटले.यावर निवृत्ता रामटेके हिने नवऱ्याला शिवीगाळ करून वाद घातला,तसेच रागाच्या भरात ती घराबाहेर निघून गेली.

बराच वेळ झाल्याने ती घरी परतली नसल्याने पती चंद्रशेखर रामटेके आणि गावकऱ्यांनी आजूबाजूला तिचा शोध घेतला,परंतु ती मिळून आली नाही. ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोळदे शेतशिवारातील नाल्याच्या काठावर बाभळीच्या झाडाला नारळाच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह मिळून आला.या घटनेसंदर्भात ३० मार्च रोजी नवेगावबांध पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.तपास सहायक फौजदार अनंतराम तुलावी करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!