उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून अवैध रेतीचा उपसा गेल्या बऱ्याच महिन्यांपासून सुरू असून अंदाजे २० हजार ब्रास च्या वर अवैध रेतीचा उपसा चोरट्यांकडून केला गेला असून गावात तसेच देसाईगंज शहर त्याचबरोबर तालुक्यातील इतर गावांमध्ये अवैध रेतीचा चोरट्यांकडून पुरवठा करून बांधकामे तसेच चोरीच्या रेतीचा वापर करून कामे पूर्ण करण्यात आली असल्याने यावर आळा घालण्यास प्रशासन चींधीचोर झाल्याचे आढळून येत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून अवैध रेतीचा उपसा दररोज रात्री तसेच पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टर तसेच इतर साधनांद्वारे केला जातो आहे.यामध्ये कोंढाळा गावातील रेती तस्कर, उसेगाव व देसाईगंज येथील रेती तस्कर ऑर्डर घेऊन बोलबाला करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.काहीजण कमी ऑर्डर मिळण्याच्या नादात रेतीचा भाव कमी करून गावात तसेच इतर ठिकाणी अवैध रेती विक्री करण्याच्या नादात जणूकाही ठेकाच घेतलेला असल्याचे दिसून येत आहे.अशातच गुपित माहितीच्या आधारे सर्वांचे खिसे गरम होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असल्याने ‘जे सुरू आहे ते सुरू राहू द्या..! एखादा साधन पकडण्यास चुपच्याप पैसे घेऊन सोडून द्या..! अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे कुणीही लक्ष घालीत नसल्याचे दिसून येत आहे.यावर कुठेतरी आळा घातला जावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.
(पुढील बातमी :- रेती चोरट्यांच्या नावानिशी)

