Saturday, May 2, 2026
Homeपालघरएसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या घरी सापडले मोठे घबाड... - ५७...

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या घरी सापडले मोठे घबाड… – ५७ तोळे सोने आणि तब्बल १ कोटी ३१ लाख रुपयांची रोख रक्कम आली आढळून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पालघर :-कितीही पैसा जवळ असला तरीही पैश्याचा मोह हा सुटता सुटेना..! या जगात पैश्याने  सर्वकाही विकत घेतले जाऊ शकते; मात्र,एकदा कमावलेली इज्जत आणि गमावलेली नाती ही कधीही विकत घेऊन मिळवता येत नाही.त्यामुळे कुठेतरी थांबा देणे आवश्यक आहे.अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे झाल्याशिवाय राहणार नाही.असाच काहीसा प्रकार पालघर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.लाचलुचपत विभागाने काल,मंगळवारी २४ डिसेंबरला एका वनपरीक्षेत्र अधिकाऱ्याला २० लाख रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात पकडल्यानंतर आता त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे.वसई तालुक्यातील ससूनवघर गावातील सात गुंठे जमिनीच्या प्रकरणात २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे आणि अन्य दोघांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले.काल मंगळवारच्या रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे याच्या घराची झडती घेतली असता,लाचलुचपत विभागाला चौरे यांच्या घरी ५७ तोळे सोने आणि तब्बल १ कोटी ३१ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे.
सन २००५ मध्ये वनविभागाने ताब्यात घेतलेल्या
तक्रारदाराच्या सात गुंठे जमिनीचा ताबा परत मिळवून
देण्यासाठी आणि वरिष्ठ कार्यालयात अनुकूल
अहवाल देण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे
यांनी २० लाखांची लाच मागितली होती.याप्रकरणी
चौकशीदरम्यान,चौरे यांनी आरोपी चंद्रकांत पाटील
आणि अन्य एका व्यक्तीशी संपर्क साधण्यास
सांगितल्याचे उघड झाले होते.लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाने सापळा रचून आरोपी चंद्रकांत पाटील
याला,काल मंगळवारी १० लाखांची रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडले होते.यावेळी चौकशीदरम्यान चौरे यांचा मुख्य सहभाग समोर आला होता.त्यामुळे चौरे,पाटील आणि एका अनोळखी इसमाविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधीत कायदा सन २०१८ चे कलम ७ आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!