Thursday, October 15, 2026
Homeमुंबईएकनाथ शिंदे यांनी सात महिन्यात जाहिरातीसाठी तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची...

एकनाथ शिंदे यांनी सात महिन्यात जाहिरातीसाठी तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची केली उधळपट्टी…- माहिती अधिकारातून झाले उघड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती उघड झाली आहे.सदर माहिती ही माहिती अधिकारातून उघड झाली आहे.मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या तिजोरीतून दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे; असा दावा आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकारातून ही माहिती समोर आणली आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासू फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती ही माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे.

जाहिरातींचे राज्य शासनाकडून हे देयके उपलब्ध झाले आहेत.यात धक्कादायक माहिती अशी की, खर्चाची सरासरी काढली तरी दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातला शासकीय पैशांची वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे, असे आर टी आय कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले.

सर्वसामन्याच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल काय? जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का? असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी केला आहे.

(साभार – साम टिव्ही)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!