Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षा.. - परीक्षा केंद्राच्या परिसरात...

उद्यापासून कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षा.. – परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी,नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात येणारी कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएशन(CUET-PG)२०२६ ही परीक्षा उद्या, शुक्रवार ६ मार्च पासून ते ७,८,९,१०,११, १२,१३,१६, १७,१८,१९,२४,२५ व २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर परीक्षा शांततेत व सुरळीत वातावरणात पार पडावी तसेच परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.हा आदेश जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला आहे.
या आदेशानुसार परीक्षा कालावधीत निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन,फॅक्स व एसटीडी बूथ सुरू ठेवण्यास मनाई राहील.तसेच परीक्षा केंद्र व परिसरात मोबाईल फोन,लॅपटॉप,पेजर,टेपरेकॉर्डर,कॅमेरा आदी उपकरणांचा वापर करण्यास बंदी राहणार आहे.याशिवाय निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी,गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे,भाषण करणे किंवा घोषणा देणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.तसेच पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली असून शस्त्र,काठ्या,लाठ्या,सुरे, तलवारी,भाले,बंदुका किंवा इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू तसेच दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.परीक्षा केंद्रापासून दोनशे मीटर अंतरावर चुन्याची सीमारेषा आखण्यात येणार आहे.
सदर आदेश कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ अधिकारी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही.तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस अधीक्षक,गडचिरोली यांच्यावर सोपविण्यात आली आहे.आदेशातील कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. हा मनाई आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत लागू राहील,असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!