Monday, August 10, 2026
Homeमुंबईअखेर राज्यातील २९ महानगरपालिकांतील महापौरपद आरक्षण ठरले..

अखेर राज्यातील २९ महानगरपालिकांतील महापौरपद आरक्षण ठरले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्री(नगर विकास)यांच्या अध्यक्षतेखाली आज, गुरुवार २२ जानेवारी रोजी परिषद सभागृह,६ वा मजला, मंत्रालय मुंबई येथे पार पडली.त्यानुसार,२९ महानगरपालिकांपैकी तब्बल १५ महानगरपालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव असून १५ पैकी दोन महापालिकांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला महापौर असतील.यात  लातूर आणि जालना या दोन महानगरपालिकांचा समावेश आहे.तर राज्यातील ८ महानगरपालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे महापौर होणार आहेत.त्यापैकी चार महापौर ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून चंद्रपूर,अकोला,जळगाव आणि अहिल्यानगर येथे ओबीसी प्रवर्गातील महिलांना महापौर होता येणार आहे.
  • २९ महानगरपालिकांतील महापौरपद आरक्षण👇
१.नागपूरः सर्वसाधारण (महिला)
२.चंद्रपूरः ओबीसी (महिला)
३.नवी मुंबईः सर्वसाधारण (महिला)
४.वसई- विरारः सर्वसाधारण
५.कल्याण- डोंबिवलीः अनुसूचित जमाती
६.छत्रपती संभाजीनगरः सर्वसाधारण
७.कोल्हापूरः ओबीसी
८.सांगली- मिरज- कुपवाडः सर्वसाधारण
९.जळगावः ओबीसी (महिला)
१०.अहिल्यानगरः ओबीसी (महिला)
११.धुळे: सर्वसाधारण (महिला)
१२.जालना: अनसूचित जाती(महिला)
१३.इचलकरंजीः ओबीसी
१४.बृहन्मुंबईः सर्वसाधारण (महिला)
१५.सोलापूरः सर्वसाधारण
१६.अमरावतीः सर्वसाधारण
१७.अकोला: ओबीसी (महिला)
१८.नाशिकः सर्वसाधारण (महिला)
१९.पिंपरी-चिंचवडः सर्वसाधारण
२०.पुणेः सर्वसाधारण (महिला)
२१.उल्हासनगरः ओबीसी
२२.ठाणे: अनुसूचित जाती
२३.परभणीः सर्वसाधारण
२४.लातूरः अनुसूचित जाती (महिला)
२५.भिवंडी- निजामपूरः सर्वसाधारण
२६.मालेगावः सर्वसाधारण (महिला)
२७.पनवेलः ओबीसी
२८.मीरा-भाईंदरः सर्वसाधारण (महिला)
२९.नांदेड- वाघाळाः सर्वसाधारण (महिला)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!