Sunday, August 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त५० लाख रुपयांचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी शरण..

५० लाख रुपयांचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी शरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा आणि दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव बारसे देवा उर्फ सुक्का याने १ जानेवारीच्या रात्री तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.त्याच्यावर शासनाने तब्बल ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.विशेष म्हणजे,केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन कगार’ आणि सुरक्षा जवानांचा वाढता प्रभाव यामुळे बारसे देवाने मध्यस्थांमार्फत चार राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला आणि तेलंगणातील कोठगुडेम जिल्हा पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.बारसे देवा हा मूळचा छत्तीसगडच्या पुर्वर्थी गावचा रहिवासी आहे.पीएलजीए (PLGA) च्या पहिल्या बटालियनचा कमांडर म्हणून त्याने अनेक वर्ष काम केले. छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव दलाच्या(सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या अनेक प्राणघातक हल्ल्यांमध्ये त्याचा थेट सहभाग होता.हिडमा सेंट्रल कमिटीत गेल्यानंतर त्याच्या सर्व जबाबदाऱ्या देवाने सांभाळल्या होत्या.त्याच्या आत्मसमर्पणानंतर नक्षली चळवळीची मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.त्यातच,काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी जहाल नक्षलवादी माडवी हिडमा याचा खात्मा केला होता.तेव्हापासूनच बारसे देवा दहशतीखाली होता. हिडमाच्या मृत्यूमुळे नक्षली गटात कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.त्यामुळे ‘मरण की शरण’ अशी अवस्था नक्षली संघटनेची झाल्याने अनेकजण हिंसेचा मार्ग सोडू लागलेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३१ जुलै रोजी जशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली,तशीच...

आज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत(MY Bharat)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'व्यसनमुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत आज...

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे...

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!