Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोली५० युवकांची तुकडी कोचीनला रवाना..

५० युवकांची तुकडी कोचीनला रवाना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार व केंद्रीय रिजर्व पोलिस दल यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ५० आदिवासी युवकांची तुकडी कोचीन (केरळ) येथे  होणाऱ्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमासाठी आज, शनिवार १८ जानेवारीला रवाना करण्यात आली.
खासदार डॉ.नामदेव किरसान व केंद्रीय रिजर्व पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा यांनी कोचीनला प्रस्थान करण्याऱ्या युवकांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.डेप्युटी कमांडंट सुमित वर्मा,जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे,सुनील चडगुलवार, रुपेश टिकले,गौरव येणप्रेड्डीवार,अनुप कोहळे यावेळी उपस्थित होते.खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी युवकांशी संवाद साधतांना आपण महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहात, त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार केंद्रीय पोलीस दलाचे पोलिस निरीक्षक अनंत जगदाळे यांनी मानले.
या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली,अहेरी आणि भामरागड या तीन तालुक्यातील ४५० युवा भारतातील ९ वेगवेगळ्या शहरांना भेटी देणार आहेत. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे आणि त्यांना विविधतेतील एकतेची संकल्पना आत्मसात करणे,त्यांना विकासात्मक उपक्रम आणि औद्योगिक प्रगतीची जाणीव करून देणे आणि आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात प्रवृत्त करणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी,मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद सत्रे,पॅनल चर्चा,व्याख्यान सत्र, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम,वक्तृत्व स्पर्धा, कौशल्य विकास,करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी,महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!