Friday, June 19, 2026
Homeगडचिरोली२८ लाखाचे बक्षीस असलेल्या ४ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण...

२८ लाखाचे बक्षीस असलेल्या ४ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाने २८ लाखाचे बक्षीस जाहीर केलेल्या ४ नक्षलींनी आज,सोमवार ३ फेब्रुवारीला गडचिरोली पोलिसांसह सिआरपीएफ जवानांपुढे आत्मसमर्पण केले.आत्मसमर्पित नक्षालिंमध्ये एक डीव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह,एक एसीएम व दोन सदस्यांचा समावेश आहे.
१)अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर,डी.व्हि.सी.एम टेक्नीकल टीम,वय ६३ वर्षे,रा.अर्कापल्ली,ता.अहेरी,जि.गडचिरोली,
२)वनिता दोहे झोरे,एसीएम टेक्नीकल टीम,वय ५४ वर्षे,रा.कोरनार,ता.एटापल्ली,जि.गडचिरोली,
३)साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर,प्लाटून-३२ सदस्य,वय ३० वर्षे रा.तुमरकोडी,ता.भामरागड जि.गडचिरोली
४)मुन्नी पोदीया कोरसा,पार्टी सदस्य,वय २५ वर्षे,रा.सिलीगेंर ता.कोळा,जि.सुकमा (छत्तीसगड) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींनी नावे आहेत.
अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर वर आजपर्यंत एकुण ८२ गुन्हे दाखल असून ३१ चकमक,१७ जाळपोळ, व ३४ इतर गुन्हांचा समावेश आहे.वनिता दोहे झोरे हि अबुझमाड मधील जटवाही,कुतुल,नेलनार या गावात ४ वर्ष जनताना स्कुलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होती.२०१० मध्ये एसीएम पदावर पदोन्नती झाली.२०१० ते २०१९ मध्ये गावागावात जाऊन मिटींग घेवुन जनताना सरकारसाठी काम केले.हिच्यावर आजपर्यंत एकुण ११ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १ चकमक, २ जाळपोळ व ८ इतर गुन्हांचा समावेश आहे.
साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर याच्यावर आजपर्यंत एकुण ४ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २ चकमक व २ इतर गुन्हांचा समावेश आहे.
मुन्नी पोदीया कोरसा हि २०१५ मध्ये बासागुडा दलममध्ये भरती होवून कार्यरत,२०१६ मध्ये प्लाटून क्र.७ सदस्य पदावर बदली होवून २०१८ पर्यंत
कार्यरत होती.२०१८ मध्ये प्लाटुन क्र.३२ मध्ये प्लाटून मेंबर म्हणून बदली.२०१९ मध्ये सप्लाय टिममध्ये बदली होवून २०२१ पर्यंत कार्यरत होती.२०२१ मध्ये माड डिव्हिजन मध्ये बदली होवून जनताना सरकार स्कुलमध्ये शिक्षक म्हणून आजपर्यंत काम केले.
आत्मसमर्पण घडवून मुख्याप्रवाहात आणण्यासाठी
संदिप पाटील पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर,अंकित गोयल, पोलीस उप- महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र,अजय कुमार शर्मा पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली व शंभु कुमार कमांण्डट ९ बटा.सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.नक्षलींनी हिंसेचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग पत्करावा, जे नक्षली सन्मानाचे जीवन जगून विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील,अश्यांना गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल,असे गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!