- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार अल्पवयीन विवाह हा कायदेशीर गुन्हा आहे.त्याचे गंभीर परिणाम होत असतांनाही बालविवाहाच्या तयारीत असलेल्या मंडपात चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून जिल्हा बाल संरक्षण पथकाने एंट्री करून बालविवाह रोखल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील वडधामना गावात उघडकीस आली.विशेष म्हणजे,१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही गोंदिया जिल्ह्यातील असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील २४ वर्षीय युवकासोबत लावण्याची तयारी सुरू होती.सदरची माहिती मिळताच नागपूर जिल्हा बाल संरक्षण पथकाने संबंधित ठिकाणी भेट दिली. त्यानंतर,पथकाने कुटुंबीयांशी संवाद साधून समुपदेशन केले. समुपदेशनानंतर कुटुंबीयांनी विवाह स्थगित करण्यास सहमती दर्शवली.सदरची कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण,चाईल्ड हेल्पलाईन प्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
- Advertisement -

