उद्रेक न्युज वृत्त :- राज्यात या वर्षीपासून नवीन रेती धोरण शासनाने आणले असून आगामी पंधरा दिवसात त्याची सर्वच जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे.त्यामुळे यावर्षी रेती घाटांचे लिलाव करण्यात आले नाहीत.नवीन रेती धोरण सर्वसामान्यांच्या हिताचे राहील; अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माहिती दिली.
सद्यास्थितीत मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत, मात्र सर्वसामान्यांना रेती उपलब्ध होत नाही.काही ठिकाणांहून येणारी वाळू अत्यंत महागडी आहे. अशातच सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसतो आहे. यावर महसूल मंत्री म्हणाले, आम्ही नवीन धोरण सर्वसामान्यांच्या हितासाठी आणले असल्यामुळे नागरिकांनीसुद्धा सहकार्य करावे; असे महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले.