Thursday, July 30, 2026
Homeगोंदिया१,१०० मिळवा अन् नगरपालिकेचे मुख्याधिकारी दाखवा…!-शिवसेनेच्यावतीने (उबाठा)मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून चिकटवण्यात आले...

१,१०० मिळवा अन् नगरपालिकेचे मुख्याधिकारी दाखवा…!-शिवसेनेच्यावतीने (उबाठा)मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून चिकटवण्यात आले स्टिकर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- येथील नगरपालिकेत गत दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रशासक राज आहे.पालिकेचे नवीन मुख्याधिकारी २६ फेब्रुवारीला रूजू झाले. त्यानंतर निवडणुकीच्या कामांचा बहाणा करून ते गायब राहिले.आता निवडणूक संपून महिना लोटत असतानाही मुख्याधिकारी पालिकेतून गायब आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली.त्या कामांना गती मिळावी म्हणून शिवसेनेच्यावतीने (उबाठा) ‘मुख्याधिकारी दाखवा,१,१०० मिळवा’ अशा आशयाचे स्टिकर मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून चिकटवण्यात आले.गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी बल्लाळ यांनी २६ फेब्रुवारीला पदभार सांभाळला.तेव्हापासून ते नगरपरिषदेची पायरीही चढले नाहीत.निवडणुकीच्या नावाखाली नागरिकांची कामे होत नव्हती.१९ एप्रिलला मतदान पार पडले. त्याला आता तब्बल महिनाभराचा काळ लोटला. तरीदेखील मुख्याधिकारी कार्यालयात येत नाहीत. नगरपालिकेची निवडणूक झाली नसल्याने पालिकेत प्रशासक राज आहे.

त्यामुळे कुणी बोलणाराच नसल्यामुळे आणि आचारसंहिता असल्याने मुख्याधिकारी त्याचा पुरेपूर लाभ घेत आहेत.मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत. कर्मचारीदेखील कार्यालयातून बेपत्ता असतात. आरोग्य,स्वच्छता,वीज,पाण्याची शहरात बोंबाबोंब आहे.अशात मुख्याधिकारी तथा प्रशासकच बेपत्ता असल्याने मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले.त्यामुळे या बाबीला घेऊन शिवसेनेचे युवासेना प्रमुख हरिश तुळसकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.१४) मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात त्यांच्या खुर्चीला हार घालून त्यावर ‘मुख्याधिकारी दाखवा,१,१०० मिळवा’ असे स्टिकर चिकटवले.त्यानंतर बुधवारी (दि.१५) मुख्याधिकारी सकाळीच पालिकेत आल्याचे दिसून आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!