Friday, October 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहृदयाला चटका लावणारी घटना.. दोन तरणेबांड मुलं अन् आई-वडिलांनी सामूहिक आत्महत्या करून...

हृदयाला चटका लावणारी घटना.. दोन तरणेबांड मुलं अन् आई-वडिलांनी सामूहिक आत्महत्या करून संपवली जीवनयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यात हृदयाला चटका लावणारी घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याने परिसरात स्मशानशांतता पसरली आहे. सदरची घटना नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार (बारड सर्कल)येथे काल बुधवारच्या रात्री घडली असून दोन तरणेबांड मुलांनी गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले.तर मुलांचे आई आणि वडील हे राहत्या घरात खाटेवर मृतावस्थेत आढळले.रमेश सोनाजी लखे,वय ५१ वर्षे(वडील), राधाबाई रमेश लखे,वय ४५ वर्षे(आई)आणि उमेश रमेश लखे,वय २५ वर्षे(मुलगा)व २२ वर्षीय गोविंद उर्फ बजरंग रमेश लखे(मुलगा)अशी मृतांची नावे आहेत.एकाच वेळी कुटुंबातील चारही जणांनी आत्महत्या केल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सामूहिक आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घरची परिस्थिती हलाखीची होती की काही कौटुंबिक कारण होते,याचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले,तर दोन्ही मुलांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली आहे.घटनेचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून तपासानंतरच सत्य समोर येईल, असे मंठाळे यांनी स्पष्ट केले.लखे कुटूंबीय अल्पभूधारक शेतकरी होते.अशातच संपूर्ण कुटुंबीयांनी एकाच वेळी एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!