Sunday, August 9, 2026
Homeजळगांवहृदयद्रावक घटना; तारेतील वीज प्रवाहामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

हृदयद्रावक घटना; तारेतील वीज प्रवाहामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावामध्ये शेतातील तारेच्या कुंपणाला सोडलेल्या विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, बुधवार २० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये विकास रामलाल पावरा वय ३५ वर्षे,पत्नी सुमन विकास पावरा वय ३० वर्षे,दोन लहान मुले पवन विकास पावरा आणि कंवल विकास पावरा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे.तर दीड वर्षाची चिमुकली दुर्गा विकास पावरा ही थोडक्यात बचावली आहे.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
एरंडोल तालुक्याच्या वरखेडी येथील एका शेतकऱ्याने शेतातील पिके वन्य प्राण्यांच्या तावडीतून सुटावे, यासाठी शेताभोवती लोखंडी तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता.अश्यातच शेतावर जाणाऱ्या पावरा कुटुंबीयांना विद्युत प्रवाहाची कल्पना नव्हती.आज बुधवारी सकाळच्या सुमारास पावरा कुटुंब काही कामानिमित्त शेतावर जाण्यासाठी निघाले असता वीजप्रवाह सोडलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याबरोबर त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि क्षणातच पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच गावात मोठी खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पोलिसांनी शेतमालकाला ताब्यात घेतले असून घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.पोलिसांकडून घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!