- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.निवडणुकीतील उमेदवार मैदानात उतरून प्रचार कार्यात मग्न झाल्याचे चित्र आहे.अश्यातच राज्यातील १७ जिल्हा परिषदा,८३ पंचायत समित्या,नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका तसेच ५७ नगर परिषदा,नगर पंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची बाब समोर आली आहे.विशेषता,आदिवासीबहुल भागात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.नंदूरबार जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण १०० टक्के,पालघरमध्ये ९३ टक्के,गडचिरोली ७० टक्के पेक्षा अधिक, धुळे ७३ टक्के,नाशिक ७२ टक्के आरक्षण लागू झाले आहे.दरम्यान,अमरावती,चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा परिषदांमध्ये ६० ते ७० टक्के आरक्षण लागू झाले आहे.तर नागपूर, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाणा या आठ जिल्हा परिषदांमध्ये ५१ ते ६० टक्के पर्यंत आरक्षण देण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायायलाच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) सरसकट २७ टक्के आरक्षण लागू करीत सरकारने अन्य समाज घटकांचे आरक्षण कमी केल्याचा आरोप करीत राहुल वाघ, विकास गवळी यांच्यासह २६ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.या सर्व याचिकांवर येत्या,मंगळवारी २५ नोव्हेंबरला सुनावणी होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय येत्या मंगळवारी काय निकाल देणार याबाबत राजकीय पक्ष,कार्यकर्ते आणि इच्छुकांचे लक्ष लागून आहे.त्यातच,सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया थांबवली जाणार नाही,असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले असल्यामुळे नगर परिषद निवडणूक होईल,असे गृहीत धरले जात आहे.विशेष म्हणजे,येत्या मंगळवारी न्यायालयाने ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण द्या आणि नंतरच निवडणूक घ्या,असे आदेश दिले तर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक किमान महिनाभर तरी पुढे ढकलली जाईल,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आल्याने अनेक ठिकाणी एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे गेले आहे.सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान एन.कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होणार आहे. आरक्षणाची बाब निवडणूक प्रक्रियेशी थेट संबंधित असल्यामुळे सर्व तथ्य समोर ठेवून निर्णय घ्यावा लागेल.पुढील सुनावणीपर्यंत नवीन कोणत्याही निवडणुकीची अधिसूचना काढू नये,जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू नये,अशी सूचना न्यायालयाने निवडणूक आयोगास केली आहे.या पार्श्वभूमीवर आता न्यायालयीन निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.३१ जानेवारीच्या आधी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या,असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते.मात्र,५० टक्क्यांच्या मर्यादितच निवडणूक घ्या,असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जर मंगळवारी दिले तर ३१ जानेवारी पर्यंत निवडणुका घेणे शक्य होणार नाही.जिल्हा परिषद आणि महापालिका यांच्यासाठी जे आरक्षण सध्या काढलेले आहे,त्यानुसारच निवडणुका घ्या,अशी अनुमती सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिली तर मात्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा लगेच करेल.सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी जिल्हा परिषद किंवा महापालिका निवडणुकीला कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही,असे काही तज्ज्ञांचे मत आहे.२०२३ च्या
मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावरून दीर्घकाळ रिक्त ठेवता येणार नाही,असे म्हटले आणि तेथील निवडणुका पार पडल्या होत्या.हे विशेष.
- Advertisement -

